Press "Enter" to skip to content

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना किशोरभाई जैन यांच्याकडून अभिवादन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती नागोठण्यातील शिवसेना शाखेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने नागोठण्यातील शिवसेना शाखेत सकाळीच एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नागोठण्यातील शिवसेना शाखेतील या कार्यक्रमाची सुरुवात राजिप सदस्य व शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नंतर किशोरभाई जैन यांच्याकडून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचे दर्शन घेत त्यांना अभिवादन करण्यात आले.

रोहा पंचायत समितीचे सदस्य संजय भोसले, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन नागोठणेकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, भक्ती जाधव, सुप्रिया महाडिक, कल्पना टेमकर, किरण लाड, राजीव टेमकर, संतोष नागोठणेकर, दिनेश वादळ, ऋत्विक माने, धनंजय जगताप, गौरव नागोठणेकर, प्रकाश कांबळे आदिंसह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.