धनंजय जगताप यांची नागोठणे शिवसेना शाखाप्रमुखपदी निवड
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या शिफारशीने नागोठण्यातील युवा शिवसैनिक धनंजय जगताप यांची शिवसेनेच्या नागोठणे शाखा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना प्रमुख हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून धनंजय जगताप यांना शिवसेना शाखेत शाखाप्रमुखपदाचे नियुक्ती पत्र शिवसेना नेते व राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी रोहा पंचायत समिती सदस्य संजय भोसले, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन नागोठणेकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, भक्ती जाधव, सुप्रिया महाडिक, कल्पना टेमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, किरण लाड, राजीव टेमकर, संतोष नागोठणेकर, दिनेश वादळ, ऋत्विक माने, गौरव नागोठणेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
धनंजय जगताप हे कराटेचे प्रशिक्षक असून त्यांनी अनेक बालक व तरुणांना कराटे प्रशिक्षण देवून त्यांना परिक्षांना सामोरे जाण्यास लावून चॅम्पियन बनविले. तसेच अनेक तरुण-तरुणींना विविध प्रकारचे बेल्ट मिळवून दिले आहेत. त्यांची तरुणांमध्ये व पालकवर्गामध्ये वेगळी क्रेज आहे. धनंजय जगताप हे गेली १५ वर्ष विभागातील युवक व युवती यांना कराटेचे प्रशिक्षण देत आहेत. धनंजय जगताप यांनी रायगड जिल्ह्यात १५०० ते १८०० कराटे खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. तसेच अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी खेळाडू घडविले आहेत. धनंजय जगताप यांच्या कामगिरीमुळे त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भुषण पुरस्कार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड द्वारेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
जगताप यांचा नागोठणे शहर व विभागातील नागरीक, तरुण युवक यांच्याशी असणारा दांडगा संपर्क लक्षात घेऊन किशोरभाई जैन यांनी त्यांच्याकडे मोठी राजकीय जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान मला दिलेली मानाची जबाबदारी मी यशस्वीरीत्या पार पाडेन व किशोरभाई जैन यांनी माझ्यावर टाकलेला विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे धनंजय जगताप यांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना सांगितले. दरम्यान शिवसेना नेते किशोरभाई जैन हे योग्य व्यक्तीलाच योग्य पद देत असतात याची पुन्हा प्रचिती आली असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.








Be First to Comment