Press "Enter" to skip to content

“महाराट्र श्री” शरीरसौष्ठव स्पर्धा

Amateur Bodybuilders Association of Maharashtra आयोजित औरंगाबाद येथे पार पडलेल्या “महाराट्र श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये रायगड हेल्थ सेंटर (कोप्रोली-उरण) चे घवघवीत यश

सिटी बेल | कोप्रोली उरण | अजय शिवकर |

गेल्या अनेक वर्षातून लौकिक मिळवलेल्या रायगड हेल्थ सेंटर, कोप्रोली-उरण मधून औरंगाबाद येथे आयोजिलेल्या “महाराट्र श्री” स्पर्धेसाठी उरण तालुक्यातील रायगड हेल्थ सेंटर, कोप्रोली या व्यायामशाळेतून विविध गटात खेळण्यासाठी पाच स्पर्धाकांची निवड करण्यात आली होती.

सदरची स्पर्धा दि. २३.०१.२०२२ रोजी खेळली गेली असून त्यामध्ये महाराष्ट्र श्री. साठी खेळलेल्या प्रांजळ पाटील (खोपटे) यांना सहभाग म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र उदय गटात अजित म्हात्रे (वशेणी) यांनी सुवर्ण पदक पटकावला तर कुमार गटात संकेत वर्तक (गोवठणे) रजत पदक तसेच महाराष्ट्र श्रीमान पदकासाठी खेळलेल्या जितेंद्र पाटील (पाणदिवे) यांनी रजत पदक व शैक्षणिक क्षेत्रातील उपजत व्यक्तिमत्व, सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती क्षेत्रातील पुरस्कार विजेते, खेळाकडे देखील विशेष कल असलेले पाणदिवे गावाचे सुपुत्र श्री. विकास पाटील सर यांनी श्रीमान गटात वयाच्या ४८ साव्या वर्षी उत्तेजनार्थ पदक मिळवले. रायगड जिल्ह्यातून शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमच खेळणारे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा आयोजकांतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

विजेत्या सर्व स्पर्धकांचे विविध स्तरांमधून आणि विशेष म्हणजे शरीर शरीरसौष्ठव विभागातर्फे अभिनंदन अभिनंदन येत आहे.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.