Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

25 जानेवारी रोजी माथेरानला होणार राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानला महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नुसार 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पर्यटना निमित्त माथेरान मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले असून यात कोवि-19 चे सर्व नियमाचे पालन करण्यात येणार असून माथेरान मध्ये येणा-या पर्यटकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या मध्ये मॅरेथॉन स्पर्धा, अश्व शर्यती, अश्वाचा फॅशनशो या सारखे कार्यक्रम करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक माथेरान मध्ये यावेत म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहीती मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.