कोमसाप उरण तर्फे साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
वशेणी – उरण |अजय शिवकर |
नुकताच वशेणी इतिहास संपादकीय मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद उरण तर्फे साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार वितरण सोहळा वशेणी येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास रायगड भूषण प्रा.एल. बी.पाटील, कोमसाप चे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.सुधीर शेठ, समन्वयक श्री.अ.वि.जंगम, कोमसाप दक्षिण रायगड अध्यक्ष श्री.संजय गुंजाळसर,अॅड.गोपाळ शेळके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.सदाशिव पाटील,उरण मधुबन कट्टा अध्यक्ष श्री.भगवान म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

एक ऑगस्ट 1920 पासून ऑनलाईन मधुबन व्हाट्सअप समुहावर साहित्यिक ज्ञानसागर प्रश्न मंजूषा हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. वर्षभरात एकूण 50 भाग झाले .या 50 भागात 300 पैकी सर्वाधिक गुण मिळवणा-या पाच विजेत्यांना, व पाच उपविजेत्यांना साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते शाॅल,सन्मानचिन्ह, पुष्पवाटिका, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे
1)श्री.प्रविण शांताराम-पनवेल
2)अॅड.संदिप बागडे-कर्जत
3)सौ.संजना जुवाटकर-ठाणे
4)श्री.संजीव पाटील-उरण
5)सौ.रंजना केणी -उरण
उपविजेते खालील प्रमाणे
1)सौ.संपदा संजीव पाटील-उरण
2)श्री.संजय होळकर- पोलादपूर
3)श्री.मनोहर म्हात्रे -विक्रोळी
4)अॅड.माधुरी थळकर- पनवेल
5)श्री. संतोष पाटील-पनवेल
विशेष पुरस्कार
1)उत्कृष्ट गीत लेखन पुरस्कार- श्री.महेश बार्शी -कर्जत
2)कोकण जनसेवक पुरस्कार- श्री.रविंद्र बेडकिहाळ – सातारा
3)उत्कृष्ट कार्यवाहक- श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे -उरण

या पुरस्कार सोहळ्या सोबत मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ात निमित्त निमंत्रित कवींचे कविसंमेलन देखील आयोजीत केले होते.या कविसंमेलनात 25 कविनी प्रतिभासंपन्न अशा कविता सादर करून उपस्थितांना काव्याचा आनंद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रंजना केणी मॅडम यांनी पाहिले.बासरी वादनातून कोपरखैरणे येथील श्री प्र.ना.बागडे यांनी ईशस्तवन सादर केले,तर सौ.जयश्री गावडे यांनी सुमधूर आवाजात स्वागत पद्य सादर केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सतिश पाटील, पुरूषोत्तम पाटील,श्री.संदेश गावंड,श्री. कैलास पाटील,श्री.अनंत तांडेल,श्री.मनोज गावंड,श्री.रमेश पाटील ,कु आदिनाथ पाटील,श्री.बी.जे.म्हात्रे आदींनी विशेष सहकार्य केले.








Be First to Comment