सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात रायगडसह संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात सर्वोच्च निकाल लावून अव्वल यश संपादन केले आहे.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील “गीता बाग” निवासस्थानी गेल्या २२ वर्षांपासून बागबगीच्याची देखभाल व साफसफाई करणारे परशुराम कटीमणी यांची होनाम्मा आणि मारुती ही दोन्ही मुले दहावीच्या परिक्षेत अनुक्रमे ६२ व ५२ टक्के मिळवून उत्तीर्ण झाली.
ही बातमी ऐकून आम्हा सर्वांनाच आनंद व अभिमान वाटला. त्यांच्या कुटुंबात १० वी पास झालेली ही पहिलीच मुलं..आपले आईवडील घेत असलेल्या मेहनतीची जाणीव ठेवत त्यांनी हे यश संपादन केले आहे. मीही माझ्यापरीने त्यांना सदैव प्रोत्साहन देत असतो. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन ! यापुढेही त्यांनी उत्तम प्रकारचे शिक्षण घेऊन मोठे नाव कमवावे. माझे सहकार्य व मार्गदर्शन नेहमीच सोबत असेल.
आमदार अनिकेत तटकरे






Be First to Comment