सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील बोरावळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानवडी गावातील तरूणाला रानवडी येथे नदीत पाण्यात पोहोताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत व्यक्तीचे प्रेत दुसऱ्यादिवशी पात्राबाहेर काढण्यात पोलादपूर पोलीसांना यश आले.
बोरावळे येथील गिरिधर दिनकर मोरे (32) हा तरूण मंगळवारी सायंकाळी सावित्री नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेला असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गुदमरून बुडाला व मयत झाला. याबाबतची तक्रार लक्ष्मण तुकाराम मोरे यांनी दिल्यावरून अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 3-2022 अन्वये नोंद होऊन एएसआय मिंडे हे एपीआय प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.
पोलादपूर पोलीसांनी सावित्री नदीपात्रातून रबरी नौकेच्या साह्याने मृत व्यक्तीचे प्रेत काढले.








Be First to Comment