माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांच्याकडून कुराण ठेवण्याच्या बॅगेचे वाटप
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांच्याकडून हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शिवाजीनगर मोहल्ला येथील पन्नास मुस्लीम बालकांना कुराण ठेवण्याच्या बॅगेचे वाटप करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीवेळी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या ब्रीदवाक्यानुसार समाजसेवा करण्यासाठी माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांनी ग्वाही दिली होती. त्यानुसार सुमारे पन्नास मुस्लीम बालकांना कुराण ठेवण्याच्या बॅगेचे वाटप माजी शहरप्रमुख सुरेश पवार यांच्या उपस्थितीत निलेश सुतार यांनी केले.
याप्रसंगी नवनियुक्त शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, मरदीप नगरकर, मंगेश नगरकर, शैलेश तलाठी, मुराद वारोसे, रामभाऊ भूतकर, नवनिर्वाचित नगरसेवक विनायक दिक्षीत व सिध्देश शेठ तसेच शिवसैनिक आणि मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment