काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पासठपुराव्यामुळे जासई-गव्हाण रस्त्याची दुरुस्ती
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जासई-गव्हाण रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे.
जासई -गव्हाण रस्ता पिडब्ल्यूडी (अलिबाग )व सिडको यांच्या कात्रीत सापडले असतांना. या रस्त्या बद्दल अनेक तक्रारी करून सुद्धा हा रस्ता होत नव्हता. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता दाट आहे. रस्त्यात खडा आहे कि खड्यात रस्ता आहे, याचा अंदाज या मार्गांवरून प्रवास करणारे स्थानिक प्रवासी, रिक्षा चालक, चारचाकी वाहनधारक व बाईक चालवणारे स्थानिक लोकांना येत होता. अक्षरशः या रस्त्यांची चालण झालेली होती. लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती.
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पिडब्ल्यूडी (अलिबाग )च्या अधिकाऱ्यांशी या रस्त्याच्या कामा विषयी विचारणा असता. त्यांनी सांगितलं कि आमच्या विभागात निधीची कमतरता आहे. असे कारण सांगितले. वास्तविक पाहता या विभागात सिडको ने 100% भु- संपादन केलेले आहे. सिडकोचे अनेक प्रकल्प या विभागात चालु आहेत. या मध्ये प्रामुख्याने. न्हावा -शिवडी सी लिंक, मास हाऊसिंग प्रकल्प, विमानतळ, नेरुळ -उरण रेल्वे मार्ग. असे अनेक प्रकल्प या ठिकाणी चालु आहेत. त्यामुळे या रस्त्यांची 100%दुरुस्ती करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यासाठी महेंद्र घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दूरधनी करून या ठिकाणची सर्व परस्थिती सांगितली. तसेच हा रस्ता लवकरात लवकर सिडकोकडे हस्तांतरित करावा अशी मागणी केली.

त्याच बरोबर सिडको चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्याशी चर्चा करून या रस्त्यावर पडलेले खड्डे यांची तातडीने डागडुजी करून ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे तिथे डांबरीकरण पॅच करून या रस्त्याची डागडुजी करण्यास सांगितले . यानंतर सिडको अधिकाऱ्यांनी ताबडतोब या रस्त्याचे काम चालु करून या रस्त्यावरचे खड्डे भरून विविध ठिकाणी डांबरीकरणाचे पॅच देण्याचे काम चालु केले आहे. त्याबद्दल येथील जनतेने महेंद्र घरत यांचे अभिनंदन व आभार मानले. त्याच बरोबर सिडको एमडी संजय मुखर्जी,जॉईन्ट एमडी कैलास शिंदे,चीफ इंजिनियर उलवे गोडबोले, गोसावी यांनी तातडीने या रोड रिपेरिंग कामाला सुरवात केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.








Be First to Comment