Press "Enter" to skip to content

महामार्गावर दिशा भरकटवणारे फलक

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलक करतोय दिशाभूल ; भोर व मंडणगड एकाच दिशेला ?

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

पोलादपूर ते महाड दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलक चक्क प्रवासी आणि वाहनचालकांची दिशाभूल करीत आहे. या फलकावर भोर हे मंडणगडच्या दिशेला असल्याचे दिशादर्शक बाणाने दर्शविल्याने हा घोळ वाढला आहे.

पोलादपूरहून कोकणातून मुंबईकडे जाताना महाड तालुक्यातील राजेवाडी फाटयाजवळील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक रस्ता मंडणगड तर त्या रस्त्याच्या विरुध्द दिशेचा रस्ता भोर मार्गे पुणे येथे जाणारा आहे. मात्र राजेवाडी फाटयाजवळ अलिकडेच नव्याने लावण्यात हा फलक मंडणगड आणि भोर हे रस्ते एकाच दिशेला असल्याचे दर्शवित असल्याने भोरकडे जाणारे प्रवासी व वाहने मंडणगड रस्त्याकडे वळत असून काही अंतराने वरंध भोर घाट न लागल्यामुळे परत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर येत आहेत. यानंतर रस्ता ओलांडून राजेवाडीच्या विरूध्द दिशेला भोर रस्त्याकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

कोकणातून येणाऱ्या प्रवाशांना पुण्याकडे जाताना या दिशादर्शक फलकामुळे होणाऱ्या फसगतीमुळे दिशाभूल झालेल्या पर्यटक व प्रवाशांकडून नाहक मनस्ताप होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.