Press "Enter" to skip to content

वसुलीच्या निमित्ताने ग्राहकांवर “दादागिरी”

बील भरले असतानाही वीज मंडळाकडून पुर्व सुचना न देता क्लिनिकचा वीज पुरवठा खंडित

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण वीज महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वीज बिला विषयी वसुलीच्या निमित्ताने ग्राहकांवर “दादागिरी” सुरु असल्याचे चित्र पेण तालुक्यात दिसून येत आहे.जोहे येथील डॉ.शेखर धुमाळ यांना देखील वीज महामंडळाने कोणतीही पूर्व सूचना न देता तसेच लाईटबील देयक भरले असताना सुध्दा त्यांच्या खाजगी क्लिनिकची लाईट खंडित करुन नाहक मनस्ताप देण्यात आला आहे.

याबाबत वीजमंडळाच्या या बेकायदेशीर कारवाई विरोधात डॉ. शेखर धुमाळ हे न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एकीकडे वीज थकबाकी असणाऱ्या बड्या कंपन्या, वीज चोरी करणारी बडी धेंड यांना सोडून या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना त्रास देण्याचे धोरण अवलंबिले आहे.वीज मीटर ची रिडींग वेळेत घेणे , वीज बील देयके ग्राहकांना वेळेत पोहचवणे यासाठी महामंडळाने खाजगी संस्था ची नेमणूक केलेली आहे.या खाजगी संस्था कडून ही कामे वेळेत होत नाहीत.यामुळे अनेक वेळा वीज बिलवरील देयकाची अंतिम तारीख उलटून गेल्यावर ग्राहकांना बील मिळते.मात्र त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा ही ग्राहकांना नाहक भोगावी लागत आहे.

जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांनी सुतीका गृह व ऍक्युपंक्चर सेंटर साठी २०१९ मध्ये नवीन व्यावसायिक वीजमीटर घेतला या वीज मीटर चे कोणत्याही महिन्याचे विजबील थकीत नसताना पेण वीज महामंडळाचे अधिकारी सपकाळे यांनी दि.१९ रोजी दुपारी आपल्या पथकासह जोहे येथील क्लिनिकचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता खंडीत केला.विशेष म्हणजे यावेळी या क्लिनिक मध्ये काही पेशंट हे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यामुळे वीज महामंडळाच्या या बेकायदेशीर कारवाई विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.