सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |
रोहा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामधे राज्यात महाविकास आघाडी असताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या निवडणुकीत गाव पातळीवर विकास आघाड्या करून आमने सामने लढत देत असल्याचे समोर आले आहे.
रोह्यात वांगणी ग्रामपंचायती मधे सर्वसाधरण जागेसाठी ७११मतांपैकी एकनाथ गोपाळ ठाकूर यांना ३३२ मते तर हिराचंद येसुराम दळवी यांना २८२ मते मिळाली याठिकाणी एकनाथ ठाकूर हे ५० मतांनी विजयी झाले आहेत.याबरोबरच वरसगावमधे सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडीत ५१६ पतांपैकी पूनम आंब्रुस्कर यांना २९५ मते तर विजय मधुकर बागुल १४५ मते मिळाली.याठीकणी पूनम आंब्रुसकर या १५० मतांची भरघोस आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत.
तर तळाघर मधे सर्वसाधरण जागेसाठी झालेल्या निवडीत ४७१ मतांपैकी संजय पांडुरंग भगत ३०६ मते मिळाली तर सागर खेळू भगत यांना अवघ्या ७९ मतांवर समाधान मानावे लागले.यामध्ये संजय भगत हे २२७ मतांनी विजयी झाले आहेत








Be First to Comment