Press "Enter" to skip to content

प्रा. एन डी पाटील यांना श्रद्धांजली

शेतकरी कामगार पक्ष जासई तर्फे वाहण्यात आली एन डी पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

अखेरच्या श्वासा पर्यंत ज्यांनी एकाच पक्षाशी आपली नाळ जोडून ठेवली असे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, विचारवंत प्रा. एन डी पाटील यांचा अकस्मात निधन झाल्याने उरण तालुक्यातील जासई येथील शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रा. एन डी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्रातील पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी जेष्ठ नेते, माजी सहकार मंत्री वयाच्या 93 व्या वर्षी काळाने त्यांच्यावर झडप मारली. गोर गरिबांचे कैवारी, शेतकरी कष्टकरी वर्गाबद्दल आस्था असलेले, जनहिताशी शेवटपर्यंत बांधिलकी जपणारे तत्वनिष्ठ व निस्वार्थी नेता “सह्याद्रीचा सिंह ” हरपला. व आपल्या सर्वांना पोरका करून गेला. असा दूर दृष्टीचा नेता पुन्हा होणार नाही. असे मत माजी सभापती नरेश घरत यांनी श्रद्धांजली प्रसंगी मांडले.शेकापचे जेष्ठ नेते गोपीनाथ ठाकूर, सरपंच संतोष घरत, गुरुनाथ घरत, नामदेव ठाकूर, अभिमन्यू ठाकूर, शेकाप जासईचे अध्यक्ष नामदेव पाटील, धीरज घरत, सुभाष घरत, बळीरामशेठ घरत, प्रदीप घरत, दत्तात्रेय घरत, अनंत पाटील आदींनी श्रद्धांजली वाहून आपले विचार व्यक्त केले. कोरोना विषयक शासनाचे सर्व नियम पाळून शेकाप जासई तर्फे प्रा. एन डी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.