Press "Enter" to skip to content

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती

विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांच्या हस्ते बेलपाडा येथील काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

गव्हाण जिल्ह्यापरिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या निधीतून आणि ग्रामपंचायत सदस्य शिल्पा किरण कडु यांच्या पाठपुराव्यामुळे बेलपाडा येथील स्मशानभूमी ते वलडेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन पनवेल महानगर पालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रितमदादा म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील हे म्हणाले की, हा रस्ता आपण जिल्हा परिषद फंडातून करत असून बेलपाडा गावासाठी एक सुसज्ज स्मशानभूमी येत्या काही दिवसात मंजूर करून गावातील इतर नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

याप्रसंगी उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, गव्हाण विभाग युवक अध्यक्ष किरण कडू, मधूशेठ पाटील, मा. सरपंच तुकाराम ठाकुर, शशी म्हात्रे, प्रविण कडू, मदन घरत, सुशांत घरत, प्रकाश कडू, किरण कडू, किरण म्हात्रे, दत्ता पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.