Press "Enter" to skip to content

मिहीर शिशिर धारकर यांच्या वाढदिवसानिमित्त

पेण मध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

माजी मंत्री आप्पासाहेब धारकर यांचे नातू मिहीर शिशिर धारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज पेण शहरात मोफत नेञ तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला पेणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवी मुंबईतील शंकरा आय हॉस्पिटल आणि दृष्टी ऑप्टीकल यांच्या माध्यमातून पेण येथील महात्मा गांधी वाचनालय येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर यासह अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमात फळ वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना मिहीर धारकर म्हणाले की पेणच्या नागरीकांबरोबर असणारे धारकर कुटुंबाचे स्नेहबंध संबंध हे मी कदापी विसरणार नाही माझे वडील शिशिर धारकर यांनी मला सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे धडे दिले आहेत ते कायम माझ्या स्मरणात राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या शिबिराला शंकरा आय हॉस्पिटल आणि दृष्टी ऑप्टीकलचे सचिन भुमकर, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, पूजा गायकवाड, सोनाली जगदाळे,लवप्रीत कौर, जुईली जोसेफ, विजय बामणे, ज्ञानोबा कांबळे, मुकुंद माने आदि टीम उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.