रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)
रोहा तालुक्यातील मौजे तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर दि. 26 जुलै रोजी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
या घटनेची पालकमंत्री या नात्याने गंभीर दखल घेऊन आदिती तटकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली आणि त्यांना या घटनेतील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने गृह विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, याकरिता पत्रान्वये विनंती केली.






Be First to Comment