Press "Enter" to skip to content

ज्येष्ठ पत्रकारांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

डॉक्टर संगीता वानखेडे यांच्यावर कारवाई होणार

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

खोपोली नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे यांच्या मनमानी व उमर्द, उध्दट वागणुकीच्या निषेधार्थ ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी १० जानेवारी रोजी बेमुदत उपोषण केले होते.

तर खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी उपोषणकर्ते भाई ओव्हाळ व खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह पदाधिकारी याच्याशी चर्चा करुन मनमानी कारभार करणाऱ्या डॉ. संगिता वानखेडे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे भाई ओव्हाळ यांनी बेमुदत उपोषण स्थगित केले.

यावेळी खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सचिव रविंद्र मोरे, समाधान दिसले, राज साळुंखे, आण्णा मलबारी, पत्रकार दिलीप पवार, संदीप ओव्हाळ, तय्यब खान, मेहबूब जमादार, दिनेश पाटील, सारिका सावंत, आकाश जाधव, शेखर परब, शिवाजी जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे भगवान खंडागळे, व्यापारी असोशिएशनचे दिलीप पोरवाल, विष्णू रेडे, बी.एस.करडे, ललित पाटील. अनील अंकुश, महेश काजळे, राहूल जाधव, बावस्कर, सुयश ओव्हाळ आदी मोठ्या संख्येने खोपोली शहरातील नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.