Press "Enter" to skip to content

चंद्रकांत चौधरी मित्र परिवाराचा पुढाकार

मीरा फाउंडेशनचा गरजवंतांना मदतीचा हातभार !

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हेच अनमोल विचार अंगी बानून आणि ते विचार प्रत्यक्षात साकारण्याचे ध्येय माथेरान शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी मित्र परिवाराच्या पुढाकाराने मीरा फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहेत.

माथेरान मधील दिव्यांग, मूकबधिर, निराधार विधवा महिलांना दरमहा एकहजार रुपये पेन्शन स्वरूपात दिली जात आहे.१६ डिसेंबर २०२१ पासून ह्या सत्कार्यास सुरुवात झाली असून आज दि.१६ जानेवारी रोजी पेन्शनचा दुसरा हप्ता सर्व गरजवंत लाभार्थ्यांना शिवसेना शाखेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानाने देण्यात आला आहे.

यावेळी चंद्रकांत चौधरी, मीरा फाउंडेशनच्या संचालिका रेखा चंद्रकांत चौधरी, उप शहरप्रमुख प्रमोद नायक, युवा सेनेचे अध्यक्ष निमेश मेहता,युवती सेनेच्या सुजाता कुंभार, अर्चना बिरामणे,संयुक्त वनसमितीचे विद्यमान अध्यक्ष योगेश जाधव, हॉटेल उद्योजक हरिभाई मेहता, जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे, अकबर मुजावर,मनोहर चाळके, रवी परब,प्रसिद्धी प्रमुख अमोल चौगुले, खालिद शेख, निखिल शिंदे, अल्ली डोंगरे, यांसह अन्य शिवसैनिक, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

माथेरान मधील दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून चंद्रकांत चौधरी हे सुपरिचित आहेत. आजही अनेकांना औषधोपचार करिता सढळ हस्ते मदत करीत आहेत.शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमींना साहित्याचे वाटप ते करीत आहेत.यामुळेच त्यांच्या या निस्वार्थी कार्याबद्दल कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यशील,विकासपुरुष आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.