कंपनीने काॅन्ट्रॅक्टरांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा गेट बंद — संजय जांभळे
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे)
स्वताच्या जमिनी कवडीमोल भावाने कंपनीला विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेएसडब्य्लु कंपनीत काॅन्ट्रक्टॅर म्हणून काम घेत असतांना कंपनीने मात्र स्थानिक काॅन्ट्रक्टॅरला देशोधडीला लावण्याचा डाव आखल्याने अखेर धायरेश्र्वर कंस्ट्रक्शन असोसिएशन च्या 65 काॅन्ट्रक्टॅरने आज पासून कंपनीतील काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की कोरोनाच्या या लाॅकडाऊन मध्ये कॉन्ट्रॅक्टरने शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन कंपनीला सर्वतोपरी सहकार्य केले आहे एप्रिल महिन्यापासून डिझेलच्या किमतीत वाढ झाली असल्याने जेसीबी पोकलेन या मनीचे ताशी रेट वाढले आहे तरी मात्र कंपनी कॉन्ट्रॅक्टरचा अंत पाहत आहे अनेकदा या बाबत कंपनी आणि असोशियन यांच्यात मिटिंग झाली आहे. कंपनीचे अधिकारी राठोड यांनी 6 महिने झाले तरी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे आजपासून कॉन्ट्रॅक्टरांनी कंपनीचे 50 टक्के काम बंद केले आहे.पेण तालुक्याच्या विकासासाठी जेएसड्ब्ल्यु कंपनीला आमच्या जमिनी दिल्या कंपनीचा एवढा मोठा प्रदुषण वाहता परिसरात कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे त्यामुळे कंपनी कॉन्ट्रॅक्टरच्यां बरोबर कुटील राजकारण करीत असल्याचा आरोप करुन आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच 100 टक्के काम बंद करण्यात येईल असा इशारा असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष संजय जांभळे यांनी दिला आहे.






Be First to Comment