Press "Enter" to skip to content

पाली नगरपंचायतीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीची बाजी

पाली शहर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे शहर करण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री आदिती तटकरे

सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायत निवडणुकीत जनतेने पहिला मान शेकाप राष्ट्रवादी आघाडीला सत्तास्थानी विराजमान करून दिला आहे. जनतेचे विशेष आभार. पाली शहराच्या विकासाच्या दृष्टीने विकासनिधीत झुकते माप देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दि.(19)बुधवारी दिली.

शेकाप राष्ट्रवादी आघाडीचा प्रत्येक लोकप्रतिनिधी जनतेच्या मनातील विकासाचा केंद्रबिंदू ठरावा असे पालकमंत्री तटकरे म्हणाल्या. पाली शहर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे शहर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. पाली नगरपंचायतीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचे पालकमंत्री आदिती तटकरेंकडून अभिनंदन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. विकासाच्या एटीम मशीनमध्ये जनतेने एटीम कार्ड टाकावे व विकासकामे करून घ्यावीत असा शब्द पालकमंत्री तटकरें यांनी यावेळी दिला.

विजयी उमेदवारांबरोबर ताकतीने लढणाऱ्या पराभूत उमेदवारांचे देखील पालकमंत्री तटकरे यांनी अभिनंदन व कौतुक केले. शेकाप व राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षाच्या उमेदवाराना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले. या विजयाने खासदार सुनिल तटकरे, व शेकाप नेते जयंत पाटील यांचे हात मजबूत झाले आहेत. पालीतील प्रत्येक नगरसेवक व नगरसेवकिने इतकी विकासकामे करा की पुढील पाच वर्षांने होणाऱ्या निवडणुकीत 17/0 या फरकाने शेकाप आघाडीला जागा मिळतील, जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द पूर्ण करू, आघाडीचा लोकप्रतिनिधी जनतेच्या मनातील विकासाचा केंद्रबिंदू ठरावा. असे ना. तटकरें म्हणाल्या.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरें ,माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल
यांनी देखील यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी शेकाप राष्ट्रवादी आघाडीचा विजय असो, गीताताई आप आगे बडो हम तुम्हारे साथ हे, सुरेशशेठ आप आगे बढो हंम तुम्हारे साथ हे या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले.

यावेळी विजयी उमेदवारांच्या विजयोत्सव कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा, राष्ट्रवादी सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा.म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर,पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सुजाता वडके, नीलम पालकर, वैशाली पालकर, रेखा साळुंके, रुचिता बेलोसे , संगीता साखरले, हर्षा चांदोरकर, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे,तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख, राजाराम देशमुख, राजेश गोळे, शेकाप पाली शहर अध्यक्ष जनार्दन जोशी, प्रियांका पालरेचा, सुधीर साखरले, युवक जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, राकेश शिंदे, संजोग शेठ ,पप्पू परबलकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, विठ्ठल सिंदकर, शशिकांत पाशीलकर, संतोष धाटवकर, विनायक जाधव,शशिकांत दंत,दीपक पवार, विनायक जाधव, सचिन साठे, रवी जाधव, अमित वरंडे,आरिफ मणियार, सुधीर साखरले, सुलतान बेनसेकर, मह्म्मदभाई धनसे, ललित ठोंबरे,महेश खंडागळे, किरण खंडागळे, इसाक पानसरे, विनय मराठे, इम्प्तीयाज पठाण, आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलीस निरीक्षक विश्वनाथ काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.