साधारण चार वर्षांपूर्वी भाई एन डी पाटील साहेब आजारी आहेत असे मला भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हा सहचिटणीस भाई कुमारदादा जाधव यांनी दुरध्वनीद्वारे कळवले माझ्या मनात घालमेल सुरू झाली कि आपण एन डी साहेबांना भेटायला गेलेच पाहिजे अशी माझ्या मनात घालमेल सुरू असतानाच तेवढ्यात मला नाशिकचे माझे मोठ्या बंधुतुल्य मित्र जिल्हा सहचिटणीस भाई अशोक बोराडे यांचा कॉल आला तो मी रिसिव्ह केला थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मि त्यांना म्हटलं भाई एन डी पाटील साहेब आजारी आहेत मला कोल्हापूर पार्टी अॉफीसमधुन भाई जाधवांचा कॉल आला होता.
मला एन डी साहेबांना भेटायला जायचे आहे ! तुम्ही येता का ?
येणार असाल तर सांगा मी आपले रेल्वे रिझर्वेशन करतो.
भाई बोराडेंनी पण क्षणाचा विलंब न करता दोन दिवसा नंतरचे रिझर्वेशन करा मी येतो आपण दोघेजन जाऊ असे म्हटले पण आमच्यात कोणीतरी असावा म्हणून मी माझे दुसरे जिवलग स्नेही व तुफान सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. संतोष गायधनी यांना कॉल केला आणि सांगितले की आपण कोल्हापूरला एन डी साहेबांना भेटायला जाऊ ते आजरी आहेत ते पण क्षणाचा विलंब न करता हो म्हणाले मी आमच्या तिघांचे महालक्ष्मी एक्स्प्रेसचे रिझर्वेशन केले आणि आमचा ठरलेला प्रवासाचा दिवस उजाडला भाई बोराडे कोल्हापूरला जाण्यासाठी माझ्याकडे सायंकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वेळे अगोदर पोहचले होते पण काही घरगुती कारणास्तव संतोष गायधनी येऊ शकले नाहीत.
कल्याण वरून आमचा रेल्वे प्रवास सुरू झाला व आम्हाला महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनलवर नियोजित वेळेत सकाळी सहा पन्नासला पोहचलो !
आम्ही दोघे स्टेशनच्या बाहेर पडलो की एन डी साहेबांना कॉल करुन सांगावं की नाही आम्ही आपल्याला भेटायला आलो आहोत असा प्रश्न आम्ही ऐकामेकांना करत होतो तेवढ्यात समोर पेपर स्टॉलवर पुढारी पेपर आम्ही घेतला आणि त्यात अगदी पहिल्याच पानावर छोट्या रकान्यात भाई एन डी पाटील यांना डिस्टार्ज झाला. हि आनंददायी बातमी वाचल्यावर आम्हाला अतिशय आनंद झाला.
मी कसलाही विचार न लगेच खिशातून मोबाईल काढला आणि एन डी साहेबांना कॉल केला लाल सलाम साहेब मी आणि भाई अशोक बोराडे तुम्हाला भेटायला कोल्हापूरात आलोत.
आजार पणातुन उठलेले असताना पण समोरुन खणखणीत आवाज आला आता कुठे आहात मि बोललो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहोत.
एन डी साहेब बोलले माझ्याकडे किती वेळात याल मला वाटले आपण शेकाप पार्टी अॉफीसला जाऊन आंघोळ वगैरे करून दोन ते तीन तास लागतील असे मोघम विचार करून मी साहेबांना बोललो तीन साडेतीन तासांत येईल ते म्हणाले ठिक आहे या मी आपली वाट बघतो आणि फोन बंद झाला.
एन डी साहेबांची तब्येत बरी आहे ऐकून आम्हा दोघांचेही चेहरे टवटवीत झाले चेहऱ्यावरचे नैराश्य दूर पळाले होते.
आम्ही पार्टी ऑफिसला गेलो तिथे जाऊन आंघोळ वगैरे केल्या व आम्हाला भाई कुमारदादा जाधव यांनी नाश्ता करण्यासाठी एका प्रसिद्ध मिसळ पावच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले तिथे नाश्ता, चहा करत बऱ्याच पुरोगामी चळवळीतील व राजकीय ईकाडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
पावसाळ्याचे दिवस असल्याने सातत्याने लाईट आणि मोबाईलचे नेटवर्क जात होते अधुन मधुन येत कधी कधी होते.
घड्याळाकडे बघीतले तर दुपारचे सुमारे दिड वाजले होते आम्ही ताडकन उठून हॉटेलच्या बाहेर पडलो. आणि रिक्षा पकडली रुईकर कॉलनीतील एन डी साहेबांच्या घरासमोर उतरलो !
घराच्या दारात पोहचताच माई (अर्थात साहेबांच्या पत्नी सरोजिनी पाटील आम्ही त्यांना आदराने माई संबोधतो) दारातच उभ्या होत्या माझ्यावर खुपच रागावलेल्या होत्या मोठ्या आवेशात म्हणाल्या आकाशभाई तुम्हाला काहीच कळत नाही का? साहेबांची तब्येत आताच कुठे थोडीफार बरी झाली आहे डॉक्टरांनी सांगितले आहे वेळेवर जेवण, नाश्ता व औषधगोळ्या घेत म्हणुन आणि साहेब तुम्ही येणार आहात म्हणून साहेबांनी अजुन नाश्ता जेवण केले नाही जेवण दिले होते तर ते म्हणतात की निर्मळ आणि बोराडे आल्यावर मी त्यांच्या सोबतच जेवणार आहे विश्वास नसेल तर आत जाऊन बघा तुमच्या तिघांना वाढलेली जेवणाची ताटं तशीच टेबलावर झाकून ठेवले आहेत.
आम्हाला माईंना आलेल्या रागाचं काहीच वाटले नाही पण डोळ्यांच्या कडा जलदगतीने पाणावल्या एकेकाळी राज्य सरकारला लोकांच्या प्रश्नांसाठी सळो की पळो करून सोडणारे माजी सहकार मंत्री भाई एन डी पाटील साहेब सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी किती हळव्या मनाचे आहेत कार्यकर्त्यांप्रती किती प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आहे.
आजच्या युगात असे कार्यकर्त्यांना जीव लावणारे चांगल्या सुनित्तीचे नेतृत्व शोधुनही सापडणार नाहीत. धन्य ते एन डी साहेब धन्य ते कार्यकर्ता प्रेम..!
– भाई आकाश निर्मळ
मध्यवर्ती कमेटी सदस्य
भारतीय शेतकरी कामगार पक्ष








Be First to Comment