Press "Enter" to skip to content

“जिजाऊ ते सावित्री सम्मान महाराष्ट्राच्या लेकींचा”

श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त विवीध उपक्रम

सिटी बेल | नंदुरबार | रामकृष्ण पाटील |

तालुक्यातील भालेर येथे श्रीमती क.पू.पाटील माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमीत्त “जिजाऊ ते सावित्री सम्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” उपक्रम राबवण्यात आला. तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती निमीत्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी इ. ५ वी ब, इ. ६ वी ब, इ. ७ वी ब च्या विद्यार्थीनींनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फूले यांची वेशभूषा स्पर्धेत उस्फूर्तपणे भाग घेतला, तसेच विद्यार्थिनींनी “मी सावित्री बोलते” ही एकपार्ती नाटीका सादर केली. याव्यतीरीक्त पोवाडे, ओव्या, स्वामी विवेकानंद यांच्या “उठा जागे व्हा जो पर्यंत ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबू नका “ या विषयावर विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब भास्कर हिरामण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मूख्याध्यापीका सौ विद्या चव्हाण, पी पी बागूल सर , प्राध्यापिका कविता पाटील, पर्यवेक्षक ए व्ही कूवर यांच्यासह कर्मचारी वृंद यांनी प्रतिमेचे पूजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही व्ही ईशी यांनी केली. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयातील पर्यवेक्षक , शिक्षक ,शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.