Press "Enter" to skip to content

पागोटे येथे रक्तदान शिबिर

हुतात्मा स्मृती दीना निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल, हुतात्मा नामदेव शंकर घरत, हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांनी 1984 साली देशासाठी दिलेले बलिदान हुतात्मा स्मृतिदिन म्हणून उरण तालुक्यात साजरा केला जातो.या हुतात्मा स्मृती दिनाचे औचित्य साधून जाणता प्रतिष्ठान पागोटे उरण व श्री साई ब्लड सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 17/1/2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा पागोटे, तालुका उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

ग्रामपंचायत पागोटे, ग्रामस्थ मंडळ पागोटे यांच्या सहकार्यातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते झाले.सर्व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी या रक्तादन शिबिराला सदिच्छा भेट दिली व शुभेच्छा दिल्या.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक रवीशेठ पाटील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते जे एम म्हात्रे,तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल,जितेंद्र पाटील, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.एकंदरीतच या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.