Press "Enter" to skip to content

पेणमध्ये धाडसी दरोडा

एसबीआयचे एटीएम फोडून ५६ लाख ३४ हजार ८०० रूपये लंपास

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मागच्या काही दिवसांपासून पेण शहरात चोऱ्यांंची घटना वाढत असून दिनांंक १७ रोजी पहाटे चार च्या सुमारास चोरट्यांनी शहरातील सनसिटी जवळ असणाऱ्या एसबीआयचे दोन एटीएम मशीन फोडून तब्बल ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरून नेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या बँकेचा एटीएम असूनही तीथे सुरक्षितेच्या बाबत काहीही नसल्याचे निदर्शनास आले आहे.तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सीसीटीव्ही कॅमेरा अथवा राञीचा सुरक्षा रक्षक नसल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. त्यामुळे या धाडसी दरोड्या बाबत नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पेण शहरात या आगोदर आठ दुकाने चोरट्यांनी फोडून लूट केली होती तर तालुक्यात ९ डिसेंबर रोजी तरणखोप येथे घरफोडी होऊन लाखोंं रुपये चोरीला गेले होते,हा प्रकार घडतो ना घडतो तोच १२ डिसेंबर रोजी भर नाक्यावरील ७ ते ८ दुकाने फोडून चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले होते,मात्र या घटना घडत असतानाही पोलिसांना या चोरांचा सुगावा लागला नाही तोच आज पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी एसबीआयचे असणारे दोन एटीएम फोडून तब्बल ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये लंपास करून मोठा दरोडा टाकण्यात आला आहे.

या दरोड्यात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून माल लंपास केला आहे.या घटनेची दखल रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी घेऊन फरार झालेल्या चोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दहा पथक तयार करण्यात आले आहेत. या घडलेल्या घटनेनंतर रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास विभागीय पोलीस अधीक्षक विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.