Press "Enter" to skip to content

झाडाची ओळख सोपी होण्यासाठी दिली झाडांना नाव

अमित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधील झाडांना दिली नाव

सिटी बेल | उरण |

पाणदिवे येथील अमित पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सारडे विकास मंच च्या सामाजिक कार्यास काही रक्कम दिली होती. त्या पैशाचा वापर करून कोमना देवी ऑक्सिजन पार्क मधील झाडांना नावे देण्यात आली.

शैक्षणिक सहल असो किंवा निसर्ग भटकंती असो मुलाना आता झाडाची नाव माहीत नाही काही ठराविक झाडाच्या जाती सोडल्या तर बऱ्याच झाडाच्या जाती बद्दल आजच्या पिढीला माहिती नाही. म्हणूनचं सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून झाडांना नावे देण्यात आली. यामुळे आजच्या पिढीला निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर झाडाच्या जाती प्रजाती माहिती होतील.

झाडांना नाव देण्यासाठी ऑनलाईन हार्ट शेफ बोर्ड मागून त्यावर ओम श्रीपती बापा आर्ट गैलरी सारडे चे प्रो विनायक म्हात्रे (दादा) याने आपल्या सुंदर हस्ताक्षरातुन ही सुंदर नाव लिहिण्यासाठी मोलाचं सहकार्य दिल. तसेच निल, रुद्र, दानिश, श्रीवेद, सारा, विभा या बच्चे कंपनीने ते लावण्यास मदत केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.