महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत होत असलेल्या कामांत ठेकेदारांची चालढकल
सिटी बेल | माथेरान |
मागील काही वर्षांपासून इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत नेमून दिलेल्या ठेकेदारांकडून नळ जोडणी तसेच मोठं मोठया पाईप लाईन टाकण्याची कामे सुरू आहेत.ही कामे करताना संबंधीत ठेकेदारांने केवळ काम एके काम हीच भूमिका अवलंबून सरसकट चांगल्या रस्त्यांची खोदाई करीत असताना रस्ते पूर्ववत न करता पुढील कामे करण्यावर अधिकाधिक भर दिला आहे.
सर्वत्र धूळ विरहित रस्ते असावेत यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात त्याचप्रमाणे अन्य महत्वाच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे रस्ते एमएमआरडीए च्या माध्यमातून तयार केले जात आहेत.या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत एस.एम.सी या एजन्सीमार्फत माथेरान शहरात पाण्याची नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे परंतु या ठेकेदारांना याबाबत काहीएक स्वारस्य दिसत नसून याकडे लक्ष देण्यास सुध्दा कुणीही पुढे येत नव्हते.
याकामी भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, सरचिटणीस राजेश चौधरी, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव ,प्रदीप घावरे,यांनी नगरपालिका अभियंता स्वागत बिरंबोळे यांच्या समवेत पाहणी करून शहरातील खोदून ठेवलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा यापुढे कुठेही खोदून दिले जाणार नाही व स्थानिक प्रशासनाची परवानगी नसेल तर गुन्हा नोंदविण्यात येईल असे भाजपच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.








Be First to Comment