Press "Enter" to skip to content

रसायनीत श्रामणेर बौध्दाचार्यं प्रशिक्षण शिबीराची सांगता

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्यं श्रामणेर प्रशिक्षण शिबीराचा समारोप गुरुवारी सायंकाळी दि.13 रोजी झाला .हे शिबिर मोहोपाडा रसायनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होते.

या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक तथा वरिष्ठ केंद्रीय शिक्षक एम.डी.सरोदे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.तर या शिबिराला जिल्हाध्यक्षा संपदाताई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विजय गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यावेळी उपस्थित राहिलेल्या भन्ते धम्मप्रिय यांना शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले. यात एकूण चालीस प्रकारच्या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.तसेच समता सैनिक दलाकडून शारीरिक कवायत व मानसिक व्यायाम यामधून समतावादी समाजनिर्मांणतेचा पाया, यावर मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या शिबिराची सांगता राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, सरचिटणीस सुशिल वाघमारे, कोषाध्यक्ष विजय कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी मान्यवरांना सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले.यानंतर शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या भन्ते धम्मप्रिय यांनी पार पडलेल्या शिबिराविषयक आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर भन्ते धम्मप्रिय यांना सॅनिटायझर व मास्क पॅकेट वाटप करण्यात आले.तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या काही शाखांचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे म्हणाले की भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व्यसनमुक्ती शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर तसेच समाजपयोगी विविध शिबिरे राबविण्याचे काम सुरू आहे.या सभेच्या वतीने माणसाला माणुसपण शिकवून माणसे घडविण्याचे काम सुरू आहे असे राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी मोहोपाडा रसायनी येथील बौध्दाचार्यं श्रामणेर प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष राम गणू जाधव, सरचिटणीस राहुल लक्ष्मण कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश गोसावी कलोते आदींसह त्यांची सदस्य कमिटी यांनी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.