कर्जत भाजपच्यावतीने आंदोलनाचा इशारा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील कर्जत डोणे महामार्ग ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी कर्जत भाजपच्यावतीने करण्यात आली आहे, महामार्ग दुरुस्त केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत डोणे महामार्ग चे काम गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. हा रस्ता हायब्रीड अन्युटी मध्ये असून ठेकेदाराने दहा वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे अनेक दिवस दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसापासून या रस्त्यावर विविध ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. जिथे कॉंक्रीट रस्ता आहे तिथे डांबराने खड्डे बुजवले जात आहेत हे पूर्णतः तांत्रिक दृष्ट्या चुकीचे असून ठेकेदारचा फायदा करण्यासाठी अशा पद्धतीचे काम करून घेतले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डांबर आणि काँक्रीट हे व्यवस्थित चिकटत नाही काही दिवसातच पुन्हा त्यावर खड्डे पडतील आणि येथे अपघात व्हायला पुनश्च सुरुवात होईल. म्हणून या बाबतीत त्वरित लक्ष घालून ठेकेदाराकडून योग्य पद्धतीत काम करून घ्यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदन भारतीय जनता पक्षाचे वतीने उपविभागीय अभियंता कर्जत यांना देण्यात आले,या प्रसंगी भाजप नेते सुनिल गोगटे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर शितोळे, सांस्कृतिक सेलचे विजय कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment