Press "Enter" to skip to content

नागरिकांना बाहेरून सीरीज विकत आणण्याची वेळ

मोहपाडा आरोग्य केंद्रात इंजेक्शन सीरीज तुटवडा

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

लस आहे पण इंजेक्शन सीरीज नाही अशी परिस्थिती मोहपाडा आरोग्य केंद्रात असून लस घ्यायची असेल तर मेडिकल स्टोअर्स मधून इंजेक्शन सीरीज विकत आणण्याची पाळी गरजवंत नागरिकांवर आली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रभाव तालुक्यात पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे अद्याप लस न घेतलेले, लशीचा दुसरी मात्रा शिल्लक असलेल्या नागरिकांची लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गर्दी वाढत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्याने पालक देखील मुलाना घेऊन आरोग्य केंद्र गाठत आहेत. मोहपाडा येथील आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असली तरि इंजेक्शन सीरीज नाही असे आरोग्य केंद्रातून सांगितले जाते. लस घ्यायची असेल तर इंजेक्शन सीरीज बाहेरुन विकत आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे खिशाला भुर्दंड देवून नागरिक लस मिळण्यासाठी रांगेत इंजेक्शन सीरीज घेवून ऊभे असल्याचे चित्र मोहपाडा आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून दिसत आहे.

अलिबाग वरून इंजेक्शन सीरीज उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना विकत आणण्यासाठी सांगितले जाते असे आरोग्य केंद्रातून उत्तर मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.