Press "Enter" to skip to content

खालापूरात बूस्टर डोसला सुरवात

खालापूर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्डचा बूस्टर डोस

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

फ्रंट लाईन वर्करसाठी कोरोना प्रतिबंधकचा बूस्टर डोस देण्यास सुरवात झाली असून खालापूर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्डचा बूस्टर डोस देण्यात आला.

खालापूरात कोरोना संसर्गाचा प्रभाव पुन्हा वाढत आहे. मागील बारा दिवसात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. शिवाय ताप आणि सर्दी रुग्णात वाढ झाली आहे. नव्या वर्षात बारा दिवसात चारशे रुग्ण सापडले आहेत. शासकीय कार्यालयात देखील अनेक कर्मचारी पुन्हा कोरोना विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पहिल्या टप्प्यात लस घेतलेले इतर फ्रंट लाईन वर्करसाठी बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.