सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील |
१९८४ ला जासई परिसरात झालेल्या शेतकर्यांच्या अंदोलनात झालेल्या पाच हुतात्मांना मानवंदना देण्यासाठी सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ ला जाणता प्रतिष्ठान पागोटे व श्री साई ब्लड बॅक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा पागोटे येथे सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबिरासाठी ग्रामपंचात पागोटे व ग्रामविकास मंडळ पागोटे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे .तरी रक्तदात्यांनी मोठ्या संखेने सहभागी होवून राष्ट्रीय उपक्रमास हातभार लावण्याचे आवाहन जाणता प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा विवेक पाटील यांनी केले आहे.अधिक माहीतीसाठी ९७६९४८६८०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.








Be First to Comment