शंकरा आय हाॅस्पीस्टल नवीन पनवेल आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे आयोजन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने वशेणी परिसर मोतीबिंदू मुक्त व्हावा असा संकल्प केला आहे.या संकल्पाचा दुसरा टप्पा संपन्न झाला. पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2021 मध्ये 46 रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले.तर दुस-या टप्प्यात शंकरा आय हाॅस्पीस्टल नवीन पनवेल आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळ आयोजीत मोतीबिंदु शिबिरात परिसरातील सोशल डिस्टंस, सॅनिटायझर व मास्क यांचा वापर करून 117 रुग्णांची तपासणी करण्यात आली.या 117 पैकी 48 रूग्ण शंकरा आय हाॅस्पीस्टल नवीन पनवेल येथे मोतीबिंदू ऑपरेशन साठी रवाना करण्यात आले.
सदर शिबिर यशस्वी करण्यास पुरूषोत्तम पाटील, डाॅ.रविंद्र गावंड, कैलास पाटील, विश्वास पाटील, किशोर म्हात्रे, मिलिंद पाटील,अनंत तांडेल, राजेश पाटील, कु.निसर्ग म्हात्रे, कु.पारिख म्हात्रे आदींनी विशेष सहकार्य केले. शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाल्याने सर्वांचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ.का.म्हात्रे यांनी आभार मानले.








Be First to Comment