Press "Enter" to skip to content

कर्जत भाजपाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाब मध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते, त्यांच्या सुरक्षते बाबत ज्या राज्यात त्यांचा दौरा होता, त्या पंजाब मधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई, बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली आहे,आम्ही सर्व नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या सोबत आहोत हे दर्शवण्यासाठी कर्जत भाजपच्यावतीने स्वाक्षरी (सही) मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.

येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात स्वाक्षरी साठी फलक लावण्यात आला होता. या फलकांवर भाजपचे कार्यकर्ते सह नागरिक स्वाक्षऱ्या करत होते. याप्रसंगी दिपक बेहेरे, सुनिल गोगटे,रमेश मुंढे,मंगेश म्हसकर, अविनाश कोळी, बळवंत घुमरे, मारुती जगताप, प्रशांत उगले,मंदार मेहेंदळे, राहूल कुळकर्णी, स्नेहा गोगटे, विजय कुलकर्णी, बिनीता घुमरे, प्रमोद पाटील आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.