…..म्हणून महेंद्र दळवी आमदार झाले, खासदार सुनिल तटकरे यांनी उलगडले रहस्य
तटकरे साहेबांमुळेच मी आमदार झालो : महेंद्र दळवी
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यास विविध पक्षाचे नेतेमंडळी एकाच विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी महेंद्र दळवी आमदार कसे झाले, याबाबत खासदार सुनिल तटकरे यांनी रहस्य उलगडले तर तटकरे साहेबांमुळेच मी आमदार झालो असल्याचे प्रतिपादन महेंद्र दळवी यांनी केले. या कार्यक्रमात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली.

खासदार सुनीलजी तटकरे यांचे वडील स्व. दत्ताजी तटकरे यांचे परममित्र नागोठण्यातील तत्कालीन समाजसेवक स्व. पांडुरंग उर्फ तात्यासाहेब टके यांचे सुपुत्र दिलीपभाई टके यांच्या मार्गदर्शनाने असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार आणि अध्यक्ष ऍड. महेश पवार यांच्या पुढाकाराने नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन गेली नऊ वर्ष सातत्याने आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. पत्रकार असोसिएशनने आपला नावलौकिक नागोठणे शहर व ग्रामीण विभागात मिळवलेला आहे. आताही नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन आपला दहावा वर्धापन दिन सोहळा मोठया दिमाखात नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात साजरा केला.
यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख, आ. महेंद्रशेठ दळवी, शिवसेना जिल्हा सल्लागार व राजिप सदस्य किशोरभाई जैन, गोवर्धन पोलसानी, यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी सुमुधुर असा गितगायनाचा कार्यक्रम पार पडला.

वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नागोठण्यातील रहिवासी असलेले व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र माहिमकर यांना कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराह पेण येथील पत्रकार देवा पेरवी यांना उत्कृष्ठ तर खेड(रत्नागिरी) येथील दै. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार चंद्रकांत बनकर यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष धम्मशील सावंत, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, सुनिल कोकळे, चेतन टके, राजेश पिंपळे, सचिन नेरपगार आदींनी मेहनत घेतली.








Be First to Comment