Press "Enter" to skip to content

रोहा रेल्वे क्रॉसिंग वरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन

कोकण रेल्वे अंतर्गत रोहा नागोठणे मार्गावरील प्रवाशांची रेल्वे क्रॉसिंग मधून होणार सुटका : वर्षभरात काम पूर्ण होणार

सिटी बेल | धम्मशील सावंत | रोहा |

कोकण रेल्वे अंतर्गत रोहा ते नागोठणे मार्गावरील प्रवाशांची रेल्वे क्रॉसिंग मधून लवकरच सुटका होणार आहे. महाराष्ट्र रेल पायाभूत सुविधा विकास महामंडळ लि. नागोठणे रोहा रेल्वे क्रॉसिंग क्र. 57 येथील
क्रॉसिंगवर पूल बांधला जाणार आहे. 30 कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे भुमीपुजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे काम होणार असून ते वर्षभरात हे काम पूर्ण होईल.

रोहा नागोठणे कडे जाणाऱ्या मार्गावर सातत्याने क्रॉसिंग दरम्यान फाटक पडत असल्याने वाहतूक खोळंबून राहत होती, शिवाय रुग्णवाहिकेला देखील अडसर निर्माण व्हायचा, या मार्गावर ब्रिज व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती, अखेर हा अत्यंत महत्वाचा व उपयुक्त ठरणारा ब्रिज लवकरच साकारणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे, पडम येथील रेल्वे क्रॉसिंग वरील पुलाच्या कामालाही फेब्रुवारी पर्यंत सुरुवात होईल , असे सुनील तटकरे यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, रेल्वेचे मुख्य प्रकल्प अधिकारी प्रमेन्द्र कुमार जैन यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.