Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते झाले राष्ट्रवादी काँग्रेसवासी

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आधार कार्ड बायोमेट्रिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस महिला अध्यक्षा मंदिरा दळवी , विकास दळवी ,प्रदीप रांजणे, प्रकाश रांजणे या दोघा भावांनी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

हॉटेल स्प्रिंग वुड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या कार्यक्रमात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भगवान चंचे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये,माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश दळवी आणि रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सागर जोशी, किरण पेमारे, मंगेश सकपाळ, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती सुनील कुमार,स्नेहा चव्हाण,मा. नगरसेविका वर्षा रॉड्रीक्झ,अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशाताई कदम आदी उपस्थित होते.

माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत त्याप्रमाणे विविध पक्षातील कार्यकर्ते हे आपल्या स्वतःच्या सोयीनुसार आणि अर्थातच स्वतःच्या पक्षात दुखावलेले असल्याने कुणी उमेदवारी मिळविण्यासाठी तर कुणी आर्थिक लाभासाठी सुध्दा काहीजण स्वतःच्या इच्छेनुसार अन्य पक्षात प्रवेश करताना मागील एक वर्षापासून इथे प्रत्येक पक्षात प्रवेश करण्याची जणू काही मालिकाच सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळेच आता येणाऱ्या निवडणूक काळापूर्वी आणखीन काय काय नवीन बदल आणि घडामोडी या अल्प मतदार संख्या असणाऱ्या अगदीच छोट्याशा गावात समस्त नागरिकांना पहावयास मिळणार आहेत याकडे सर्वच नवोदित मतदारांचे सुध्दा लक्ष वेधले गेले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.