सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरान मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासकीय शुल्क आकारून आधार कार्ड दुरुस्ती शिबिराचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे त्यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
यावेळी भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, मा.नगरसेवक चंद्रकांत जाधव,प्रदीप घावरे, संदीप कदम ,राकेश चौधरी व लक्ष्मण शिंगाडे , नगरसेविका प्रियांका कदम, नगरसेविका रुपाली आखाडे, मा.अध्यक्ष विलास पाटील , अरविंद शेलार ,सुनील शिंदे,मनीषा पाटील मनोहर रांजणे,रजनी कदम,तुषार जांभळे,बाबू बर्गे,सुभाष भोसले,संजय भोसले, मा.नगरसेवक गजानन अबनावे, आंबो चौधरी, अमोल चौगुले,यांसह भाजपचे असंख्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

माथेरान मधील नागरिकांना विविध शासकीय अथवा निमशासकीय कामांसाठी अनेकदा कर्जत येथे जावे लागते ही बाब खूपच खर्चिक असून सर्वसामान्य लोकांना न परवडणारी आहे याकामी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शासकीय शुल्क आकारून दोन दिवसीय आधार कार्ड दुरुस्ती शिबीर आयोजित केले त्यास नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. यापुढेही नागरिकांना आवश्यक असणाऱ्या महत्वपूर्ण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे असे भाजपच्या पदाधिका-यांनी सांगितले.








Be First to Comment