सिटी बेल | अलीबाग |
जीवनाची वाटचाल खडतर असेल तर जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ येतो मुळेखंड येथील एक नवतरुण याने एक अलौकिक आणि अनोखा इतिहास नोंदविला आहे एका वर्षात 30 ते 35 गडकिल्ले पूर्ण करायचे असा मानस धरून सुरू केलेला प्रवास २९ किल्ले पूर्ण करत थोडा अपूर्ण राहिला, पण हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देऊन येत्या वर्षात 30 पेक्षा जास्त किल्ले बघता यावेत यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहीन…महाराष्ट्रात ३५० पेक्षा जास्त किल्ले आहेत. आणि आयुष्य कमी पडेल सर्व गडकिल्ले बघायला.. येणाऱ्या पिढी ला तसेच ज्यांना गडकिल्ले चढणे शक्य नाही अशा लोकांपर्यंत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा,, यासाठी हा छोटासा प्रयत्न. आपल्या yubtube चॅनेल द्वारे आपण जमेल तेवढी गडकिल्ले ची माहिती लोकांपर्यंत पोहोचूया… धन्यवाद।।
वजीर सुळका– CDS जनरल बिपिन रावत यांना वजीर सुळक्या वरुन मानवंदना दिली
ठाणे जिल्ह्यातील शहापूर माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला २८० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.
सुळक्याची २८० फुटांची ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते
महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर च्या धडाकेबाज गिर्यारोहकांनी 19 डिसेंबर ला केले. एस.आर.ए. टीम यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर सुळका सर करून आम्ही गिर्यारोहण क्षेत्रात एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे. या मोहिमेत सर्व क्लायम्बर यांनी मोहिमेची धुरा सांभाळली आणि वजीर सुळक्यावर CDS जनरल बिपिन रावत यांना वजीर सुळक्या वरुन मानवंदना दिली आणि प्राणप्रिय भारतीय राष्ट्रधज फडकावला.
आणि ,वजीर सुळखा सर करणारा, (स्वप्निल लक्ष्मण भोईर) हा उरण मधील पहिलाच नागरिक आहे….होय या सर्व अलौकिक साहस लक्षात घेऊन स्वप्नील भोईर यास कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्काराने अलिबाग
चे लोकप्रिय स्वर्गीय आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र उमेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सदर प्रसंगी भाई जगताप सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार सन्मानीय भाई जगताप व सर्व पदाधिकारीउपस्थित होते
१)कुलाबा किल्ला२)जंजिरा किल्ला३)खांदेरी उंदेरी४)वसई चा किल्ला५)शनिवारवाडा६)सिं। ७)कोराईगड८)विसापूर९)लोहगड१०)रतनगड११)हरिश्चंद्रगड१२)जीवधन१३)प्रतापगड१४) १५)शिवनेरी१६)सज्जनग१७)हरगड१८)मुल्हेर१९)मोरागड२०)साल्हेर२१)सालोटा२२)भैरवगड
२३)कलावंतीण दुर्ग२४)इर्शालगड२५)प्रबळगड६)पेबगड२७)सागरगड२८)मृगगड
२९)वजीर सुळकास्वप्निल लक्ष्मण भोईर*
कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय 2022 पुरस्काराने सन्मानित








Be First to Comment