गोवे गावात घरफोडी : रोख रक्कम,मोबाईल लंपास
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असून,गोवे येथे दि.३० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली आहे,यात रोख रक्कम,व मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली आहे.या वाढत्या चोरीच्या घटने मुले पोलिसांच्या समोर या चोरांना पकडण्याचे आहवान उभे ठाकले असून पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास वेगात सुरू आहे.
याबाबत पोलीस यंत्रणे कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार
गजान तुकाराम जाधव रा.गोवे कोलाड यांच्या घरातून दि.३० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा लॉक उपकृन घरात प्रवेश केला व घरातून 5 हजार रूपये किमतीचा मोबाईल तसेच रोख रक्कम रु.२० हजार लपास केली आहे.तरी या चोरीचा तपास वेगात सुरू असून,
कोलाड पोलिसांत यांची नोंद ००४९/२०२० भा द वी कलम ४५७,३८० प्रमाणे करण्यात आली असून,या चोरीचा पुढील तपास कोलाड पोलीस करीत आहेत.






Be First to Comment