सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
गेल्या काही दिवसात इयत्ता बारावी आणि दहावीच्या परिक्षांचे निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून जाहिर करण्यात आले आहेत. यावर्षीच्या दोन्ही निकालात पुन्हा एकदा कोकणने अव्वलस्थानी येऊन आपली परंपरा अबाधित ठेवण्यात यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले.
नागोठणे विभागातील शाळा आणि कॉलेजचा निकाल समाधान कारक लागल्याने रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने नागोठणे विभागातील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या कालावधीतील शासनाच्या नियमावलीचे पालन करून यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले.
यावेळी रोहा तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष कु.अक्षय अनिल नागोठणेकर, नागोठणे शहर विद्यार्थी संघटना अध्यक्ष कु.केतन भोय, सचिव कु.ओमकार लाड, सहसचिव कु.उमेर सांगाडे आदीसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.






Be First to Comment