सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा हि तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रुप ग्रामपंचायत आहे. उप विभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार अयुब तांबोळी,नायब तहसीलदार कल्याणी मोहिते , मंडळ अधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तलाठी शिंदे यांच्या वासांबे तलाठी सजेतील शिवनगर वाडी, पानशील वाडी, खोंड्याचि वाडी, रीस वाडी, मोहोपाडा, शिंदी कातकरी वाडीवर जातीचे दाखले काढण्यासाठी फॉर्म्स भरून घेण्यात आले.

कोवीड विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जातीचे दाखले काढण्यासाठी एकत्रितपने बोलावून शिबिर घेणे शक्य नाही. म्हणून कोवीड विषाणूचा संसर्ग वाढू नये या करिता प्रत्येक वाडीवर जावून फॉर्म्स भरून घेण्यात आले होते. वासांबे तलाठी सजातील वाडयांवर शिवनगरवाडी, पानशीलवाडी, खोंडयाचीविडी ,रीसवाडी कातकरीवाडी , शिंदी वाडी, मोहोपाडावाडी,पराडे वाडी याठिकाणी फॉर्म्स दाखल्यांकरिता फार्मं भरुन घेण्यात आले.यावेळी आदीवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








Be First to Comment