खालापूर पॅटर्न खोपोलीत : नागरिकांची घरोघरी जावून आरोग्य तपासणी
सिटी बेल लाइव्ह / खालापूर(मनोज कळमकर)
कोरोनाचा संसर्ग खालापूर तालुक्यात वेगाने पसरत असून सामान्य नागरिक हवालदिल झाले असताना खोपोली नगरपरिषद घरोघरी आरोग्य तपासणीसाठी खालापूर पॅटर्न वापरणार असून कोरोना प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
कोरोनाची चाहूल लागताच एप्रिल महिन्यातच खालापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यानी खालापूरातील खाजगी सेवा देणारे ङाॅक्टरांच्या मदतीने घरोघरी आरोग्य तपासणी मोहिम राबवली होती.त्यामुळे खालापूर नगरपंचायत हद्दीत कोरोना प्रसाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.त्याच्या विरूद्ध परिस्थिती खोपोली शहरात होती.दररोज मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण सापङत होते.खोपोली नगरपरिषदेचा प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कारभार सुरेखा भणगे यानी हाती घेताच नियमांचे पालन न करणारे नागरिक,दुकानदार यांच्यावर दंङात्मक कारवाई केली होती.कारवाई पुरते मर्यादित न राहता नगरपरिषदेची जबाबदारी म्हणून आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे,उपनराध्यक्षा विनिता कांबळी औटी,आरोग्य सभापती वैशाली जाधव यांच्यासह सर्व सभापतक, नगरसेवक आणि नगरसेविकांच्या पुढाकाराने 1 व 2 ऑगस्ट रोजी नगरपरिषद खोपोलीच्या वतीने “आरोग्य सेवा तुमच्या दारी” या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा खवखवणे अशा प्रकारचा काही त्रास हाेत असेल तर आरोग्य सेवा देणाऱ्या पथकाला माहिती देण्याचे आवाहन नगराध्यक्षा सुमन औसरमल यानी केले आहे.
वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञ डॉक्टर्स यांनी सुचविल्याप्रमाणे उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची टीमही सज्ज असणार आहे. नागरिकानी स्वतःची तपासणी करण्यास सहकार्य करावे. नागरिकांनी या माेहिमेत सहभागी होऊन नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, ही विनंती. (श्रीमती सुरेखा भणगे-प्रभारी मुख्याधिकारी खोपोली नगर परिषद)






Be First to Comment