कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय २०२२ पुरस्काराने निगा फाऊडेशनचा सन्मान
सिटी बेल | अलीबाग |
आपली प्रगती ही आपण सकारात्मक विचार केल्याने होते हाच विचार व आपला आत्मविश्वास व कठीण परिश्रम हे यशाचे गमक होय उरण पूर्वविभागात सातत्याने क्रीडात्मक विकास , असेल सामाजिक , शैक्षणिक, क्रीडात्मक जलतरण व मिनी मॅरेथॉन स्पर्धा नवतरुण खेळाडू याना व्यासपीठ मिळवून देऊन दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी सतत प्रयत्न शील असणारे विद्यार्थी दत्तक पालक योजना अंतर्गत गोरगरिब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन योग्य ती शैक्षणिक आधार देण्याचं कार्य करत असतात तसेच सांस्कृतिक कार्यक्रम दीपावली संध्या असे अनेक उपक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था निगा फाउंडेशन आवरे संस्थेच्या या कार्याची दखल घेत अलिबाग चे लोकप्रिय स्वर्गीय आमदार मधुकर ठाकूर आमदार यांचे सुपुत्र ऍड उमेश दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाई जगताप मित्रमंडळ रायगड व स्वर्गीय मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या कार्यची दखल घेत तर्फे कुलाबा जीवन दर्शन राष्ट्रीय २०२२ या मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष निलेश गावंड , सचिव निवास गावंड व उपाध्यक्ष राकेश गावंड यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी भाई जगताप मित्र मंडळ रायगड व स्वर्गीय मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.यावेळी निगा फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी आयोजकाचे आभार मानले उपस्थितांचे आभार मानले.








Be First to Comment