सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व रायगड जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्याकडून यांच्या शुभहस्ते माणुसकी दिनदर्शिकेचे चे प्रकाशन करण्यात आले.
माणुसकी प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते यावेळीही नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुन्दर सुबक वर्षभराचे कॅलेंडर छापून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅलेंडर झोपडपट्टीवासी, आदिवासी तसेच गरजू गरीब वस्ती आहे अशा ठिकाणी वाटण्यात येणार आहे.
याप्रसंगी डॉ. किरण पाटील यांनी माणुसकीच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या व या नवीन उपक्रमाचे स्वागत केले, डॉ. ज्ञानदा फणसे यांनी माणुसकीचे समाजकार्य असेच चालू राहो व या वर्षी देखील नवनवीन उपक्रम राबवावेत या अपेक्षा करत माणुसकीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्हा परिषद समन्वयक जयवंत गायकवाड हे नेहमीच माणुसकी टीमला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यास प्रवृत्त व मार्गदर्शन करत असतात त्यांनी ही शुभेच्छा दिल्या. संवादतज्ञ सुरेश पाटील, संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्ग या वेळी उपस्थित होते.
माणुसकी प्रतिष्ठानकडून कार्याध्यक्ष तानाजी आगलावे यांनी कॅलेंडर ची संपूर्ण माहिती दिली व माणुसकी उपाध्यक्ष सतीश कणसे, कायदेशीर सल्लागार ऍड भूषण जंजीर, शिक्षण विभाग सदस्य संदीप वारगे व इतर माणुसकी सदस्य उपस्थित होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment