नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा ९ जानेवारीला दशकपूर्ती वर्धापन दिन सोहळा
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
गेली नऊ वर्षे सातत्याने आपला वर्धापन दिन नित्यनियमाने साजरा करून नागोठणे शहर व ग्रामीण विभागात नावलौकिक झालेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा दहावा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाला रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख, आ. महेंद्र्शेठ दळवी, आ. अनिकेतभाई तटकरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शिवसेना जिल्हा सल्लागार व राजिप सदस्य किशोरभाई जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी पत्रकार असोसिएशनकडून करण्यात आली असून यासंदर्भात संघटनेची एक बैठक नुकतीच घेण्यात आली.

पत्रकार असोसिएशनच्या या बैठकीच्या सुरुवातीलाच कोरोनाकाळात मृत्यूमुखी पडलेले संघटनेचे दिवंगत सचिव अॅड. विजयपाल सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी सचिवपदी दै. लोकमत व दै. पुण्यानगरीचे नागोठणे प्रतिनिधी अनिल पवार यांच्या नावाची घोषणा संस्थापक शामकांत नेरपगार यांनी केली. त्यास सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिली.
याच बैठकीत मूळचे नागोठण्यातील रहिवासी असलेले व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र माहिमकर यांना कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराह पेण येथील पत्रकार देवा पेरवी यांना उत्कृष्ठ तर खेड(रत्नागिरी) येथील पत्रकार चंद्रकांत बनकर यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. याच बैठकीत नागोठणे विभागासह जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा सत्कार खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
नागोठणे ग्रामीण विभाग संघटनेचे मार्गदर्शक भाई टके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीला पत्रकार संघटनेचे प्रमुख हितचिंतक हरेशशेठ काळे, लियाकतशेठ कडवेकर यांच्यासह पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष अॅड. महेश पवार, उपाध्यक्ष धाम्मशील सावंत, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, सुनील कोकळे, चेतन टके, राजेश पिंपळे, सचिन नेरपगार आदी उपस्थित होते.








Be First to Comment