Press "Enter" to skip to content

म्हसळे तालुक्यातील लिपणीवावे आठवणींचा हिंदोळा

इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड चा 11 वा स्नेहमेळावा संपन्न

सिटी बेल | म्हसळे | अजय शिवकर |

सामाजिक सुधारणा, विद्यार्थाना शैक्षणिक मदत आणि आठवणींचा हिंदोळा या त्रिसूत्रीवर अधारीत असलेल्या इंडिया झिंदाबाद (आय.झेड)फ्रेण्डस गृप रायगड चा नुकताच म्हसळे तालुक्यातील लिपणीवावे या गावात ११ वा आठवणींचा हिंदोळा स्नेहमेळावा संपन्न झाला.

या वेळी लिपणीवावे येथील बैध्दवाडीत सामाजिक सुधारणा म्हणून पाच सिटिंग गार्डन बेंचेसचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.सदर लोकार्पण सोहळा सातारा जिल्ह्यातील नवउद्योजक श्रीमान विशाल कणसे , वशेणी उरण ग्रामपंचायत सदस्य श्री.संदेश गावंड , म्हसळे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री नंदू शिर्के आणि इंडिया झिंदाबाद मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश थवई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

तसेच लिपणी वावे उर्दू व तोराडी उर्दू शाळेतील 100 मुलांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री.रवि पाटील, महेंद्र भोईर, प्रविण कांबळे, नंदुभाई सावंत, धनंजय म्हात्रे, रमेश पाटील, बी.जे.म्हात्रे, नरेश पाटील, सुबोध पाटील, सुरेश शिरसाठ, अनंत तांडेल, मंगेश काशिद, हेमंत माळी,प्रविण कांबळे,नरेश सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.

बौध्द समाज व मुस्लिम समाज यांना सामाजिक सुधारणा व शैक्षणिक भेटवस्तू देऊन इंडिया झिंदाबाद मंडळाने नावाप्रमाणेच सर्वधर्म समभाव जतन करण्यासाठी केलेले कार्य गौरवास्पद आहे.असे मत नवउद्योजक श्री विशाल कणसे यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी इंडिया झिंदाबाद मंडळाचा कार्यपरिचय उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांना करून दिला. तर श्री.राकेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मच्छिंद्रनाथ म्हात्रे, राकेश पाटील, महेंद्र पाटील व शंकर काथारा यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सदानंद शिर्के ,मंगेश काशिद यांनी विशेष सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.