Press "Enter" to skip to content

शाळेत अनेक उपक्रमांचे आयोजन

राजिप प्राथ.शाळा देवखोल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीच्या निमित्ताने तसेच ‘ जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान ‘ अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवखोल, तालुका श्रीवर्धन येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांची वेशभूषा केल्याने कार्यक्रमाला अधिकच शोभा आली. या वेळी मुख्याध्यापिका क्रांती भोसले ,गांगोडे सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत दिनांक ३ ते १२ जानेवारी कालावधीत शाळेत वेशभूषा, निबंध, यशस्वी महिलांच्या मुलाखती व सन्मान, समूह गायन, चित्रकला, भाषणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती क्रांती भोसले यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.