Press "Enter" to skip to content

खासदार श्रीरंग बारणे देशात दुसऱ्या क्रमांकावर

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केले अभिनंदन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

देशात सर्वोत्तम कामगिरी करण्यात 543 खासदारांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत, त्यामुळे कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

17 व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच झालेल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांच्या यादी संसदेच्या 1 जून 2019 ते 22 डिसेंबर 2021 लोकसभेतील कामगिरीच्या रेकॉर्ड मधील नोंदीनुसार पी आर एस या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहीर केली आहे, यामध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची देशाच्या 543 खासदारांच्या मध्ये 2 नंबरची कामगिरी राहिली आहे.त्याबद्दल कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी त्याची भेट घेवून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

याप्रसंगी युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी, माथेरान शिवसेना नेते प्रसाद सावंत, नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, उद्योजक केतन जोशी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.