Press "Enter" to skip to content

राजा केणी यांच्या प्रयत्नांना यश

कुसुंबळे येथे रखडलेल्या चेक डॅम चे जे एस डब्लू कडून भूमिपूजन

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे तब्बल ४९ वर्षांपुर्वी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीकानी पाहिलेलं स्वप्न नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला साकार होण्याची चिन्ह दिसत आहेत.

कुसुंबळे ग्रामपंचायत व शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी यांचे पुढाकाराने जे एस डब्ल्यू व डब्लू टी आर च्या सहकार्याने कुसुंबळे खजरीवाडी चावढाय देवी मंदिर परिसरात भग्न अवस्थेत व पाण्याबरोबर वाहून गेलेल्या जंगलातील जुन्या दगडी बंधाऱ्याला जोडून नवीन सिमेंट डॅम चे भूमिपूजन दिनांक ४ जानेवारी रोजी जे एस डब्ल्यू चे सीएसआर आर अधिकारी मा. दळवी मा.बेटकेकर मा.नारायण मा.अनुराग पाटील मा. रशिक जाधव साहेब व जलसंधारण अधिकारी, शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी, ग्रामपंचायत सरपंच मीना लोभी, उपसरपंच रसिका केणी ह्यांचे हस्ते करण्यात आले.

ह्या बंधाऱ्या मुळे कुसुंबळे विभागातील भात शेती दुबार लागवडीखाली येणार असल्याचे जलव्यवस्थापन कमिटीच्या अधिकारी यांनी सांगितले त्याच बरोबर परिसरात भविष्यात बनविल्या जाणाऱ्या बोअरवेल ला देखील निश्चित स्वरूपात पाणी लागून विविध शेतीपूरक व्यवसाय तसेच शेतीभीमुख उद्योगधंदे व लघुउद्योगाना चालना मिळणार असल्याने गावकरी मंडळी व ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी जेएसडब्लू व जलसंधारण अधिकारी यांचे आभार मानले.

पाणी आडवा पाणी जिरवा ह्या संकल्पनेतून या पुर्वी देखील या परिसरात धरण प्रकल्पा करिता विविध सत्ताधारी वर्गाकडून उदघाटन झाले होते परंतु त्या योजना केवळ कागदावर ठेऊन प्रकल्प रखडलेला ठेवला,
मागील अनेक काळापासून शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी कोणत्याही माध्यमातून हा बंधारा पूर्ण करण्याचा चंग बांधला त्याच अनुषंघाने जेएसडब्ल्यू कंपनीने सी.यस. आर फंडातुन सदर प्रकल्पासाठी मदतीचा हात देऊन जनतेच्या मनात असलेला प्रकल्प साकारण्यात पुढाकार घेतला.

कुसुम्बळे येथिल प्रलंबित बंधारा पूर्ण झाल्यास डोंगरा कडून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्याचा वापर योग्य होऊन त्याचा वापर करून विभागातील शेतीला उन्हाळ्या च्या काळात देखील कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होऊन येथील शेतकरी व्यावसायिक, लघुउद्योग, पोल्ट्री धारक तसेच भाजी व्यवसाय करणारे शेतकरी ह्यांच्या विकासात भर पडून कुसुंबळे विभागातील शेतकरी वर्ग सधन होण्यास मदतच होईल असे प्रतिपादन शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी यांनी सागितले.

या कार्यक्रमास शिवसेना उप तालुकाप्रमुख प्रकाश पाटील विभाग प्रमुख योगेश जुईकर संरपच मिना लोभी उप संरपच रसिका केणी संपर्क प्रमुख शैलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील प्रमोद पाटील जिवन पाटील जागृती पाटील अतिष नाईक तंटामुक्ती अध्यक्ष गजान्न खंरसबळे, सदर कार्यक्रमात ग्रूप ग्राम पंचायत कुसुंबळे चे सर्व सदस्य,कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ वर्ग, आदिवासी बांधव, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांचे बरोबरीने विभागातील जुने जाणते जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.