Press "Enter" to skip to content

शिवप्रेमी सामाजिक संस्थाचा पुरस्कार

डॉ.राजाराम हुलवान “शिवरत्न भूषण पुरस्कार” ने सन्मानित

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील जित नगर येथे कार्यरत असणाऱ्या माणुसकी प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य)चे संस्थापक अध्यक्ष राजाराम मायाप्पा हुलवान यांना लोणारे येथील शिवप्रेमी सामाजिक संस्थाच्या वतीने शिवरत्न भूषण पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्काराचे वितरण लोणारे येथे करण्यात आले.

माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर सामाजिक संस्था रायगड महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. राजाराम मायाप्पा हुलवान हे हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सन्मानित करण्यात आले. आरोग्य विभागात तसेच स्वच्छता, वृक्षारोपण, शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन, क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे रायगडयांनी घेत त्यांनी डॉ. राजाराम हुलवान यांना शिवरत्न भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्याचे कार्य निरंतर सुरू रहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
लोणारे येथील शिवप्रेमी सामाजिक संस्था या कार्याचा आदर व प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात पसरवण्याचे कार्य तसेच विविध कला गुणांना वाव देण्याचे कार्य करीत असलेल्या संस्था, व्यक्ती यांना
शिवरत्न भूषण पुरस्कारदेऊन प्रोत्साहित करण्याचे कार्य करीत आहे.यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तानाजी आगलावे,ज्ञानदीप भोईनकर,संतोष वाघमारे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.